याला म्हणतात दणका !

 Vidhan Bhavan
याला म्हणतात दणका !
याला म्हणतात दणका !
याला म्हणतात दणका !
याला म्हणतात दणका !
See all

नरिमन पॉईंट- मंत्रालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी होणारा भेदभाव 'मुंबई लाईव्ह'नं मांडला होता. 'मुंबई लाईव्ह'च्या बातमीनंतर अखेर या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीकडे पालिकेनं लक्ष दिलंय. जय भवानी रहिवासी सेवा संघ वसाहतीत ए वॉर्ड पालिका विभागाने किटकनाशक फवारणी केली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून या वसाहतीत डेंग्यूची मोठ्या प्रमाणात साथ पसरली होती. पण पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला होता. 'मुंबई लाईव्ह'ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध करताच शिवसेनेच्या कुलाबा विभागाने याची दखल घेतली. या संदर्भात कीटकनाशक अधिकारी के. कांबळे यांना निवेदन सदर करण्यात आले. त्यानंतर वसाहतीत फवारणी करण्यात आली.

Loading Comments