Advertisement

मुंबईत धावणार 'ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी'

शहरातील कुर्ला आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे.

मुंबईत धावणार 'ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी'
SHARES

शहरातील प्रवास आधुनिक करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. मुंबईत (mumbai) मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पॉड टॅक्सी (pod taxi) प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात हे पार पडणार असून शहारातील सर्वात दाट लोकवस्ती असेलेल्या परिसरांमध्ये ही टॅक्सी धावणार आहे.

लवकरच ही टॅक्सी शहरात सुरू होणार असून प्रवास जलद व आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

शहरातील कुर्ला (kurla) आणि वांद्रे पूर्वदरम्यान पहिल्या टप्प्यात पॉड टॅक्सीची सुरुवात होणार आहे. या भागात 3.36 किमी मार्गावर ही टॅक्सी धावेल. या मार्गावर एकूण 8 स्थानकं असतील.

वांद्रे पूर्व, कलानगर,एमएमआरडीए जुनी इमारत, एक्साईझ डिपार्टमेंट, भारत डायमंड बोर्स गेट 11, एमएमआरडीए पे अँड पार्क, एलबीएस मार्ग आणि कुर्ला या स्थानकांवर थांबे असतील. वांद्रे-कुर्ला संकुलात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या टॅक्सीचा मोठा फायदा होणार आहे.

2031 पर्यंत पॉड टॅक्सीच्या मार्गाचा 8.85 किमीपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. या मार्गावर 22 स्थानकं असतील.

यापूर्वी 38 स्थानकांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण नंतर त्यांची संख्या कमी करून ती 22 करण्यात आली.

दरम्यान, बीकेसीमध्ये (bkc) पॉड टॅक्सीच्या मार्गाचा पुढे वर्तुळाकर लूप वाढवून विस्तार केला जाणार आहे. पॉड टॅक्सी फक्त या ठराविक स्थानकांवरच थांबणार आहे.

या लूपच्या मदतीने नागरिक आपला मार्ग निवडू शकतात. त्यामुळे प्रवासात वेळ वाचणार आहे.

या मार्गावर प्रत्येक 200 मीटर अंतरावर वातानुकूलित स्थानकं असतील. प्रत्येक पॉड टॅक्सीमध्ये (pod taxi) एका वेळी सहा प्रवासी प्रवास करू शकतील. ताशी 40 किमी वेगाने ही टॅक्सी धावणार आहे.

2031पर्यंत 1.09 लाख प्रवासी प्रवास करतील. 2022मधील अंदाजानुसार प्रत्येक किलोमीटरवर 21 रुपये भाडं असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी 1,016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 2027पर्यंत ही टॅक्सी मुंबईतील (mumbai) मार्गांवर धावणार आहे.

ही पॉड टॅक्सी पूर्णपणे ड्रायव्हरलेस असून 8 मीटर उंच खांबांच्या आधारे 8 इंच रुंदीच्या एलिव्हेटेड ट्रॅकवरून धावेल.

या टॅक्सीची लांबी 3.5 मीटर असून रुंदी 1.47 मीटर आणि उंची फक्त 1.8 मीटर असेल. यामुळे पॉड टॅक्सीने मुंबईच्या वाहतूककोंडीतून प्रवास करणं सोपं होणार आहे.



हेही वाचा

मुंबई सेंट्रल : प्लॅटफॉर्मच्या कामासाठी 60 दिवसांचा ब्लॉक

ठाण्यातील धरणात पुरेसाच पाणीसाठा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा