Advertisement

डोंगरीतील भाजी विक्रेत्यांना पोलिसांकडून छत्रीचे वाटप


डोंगरीतील भाजी विक्रेत्यांना पोलिसांकडून छत्रीचे वाटप
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील अनेक मोठे भाजीपाला मार्केट हे मोकळ्या मैदानात हलवण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर डोंगरीपोलिसांनी देखील त्यांच्या हद्दीतील मार्केट हे पालिकेच्या मैदानात हलवले आहे. त्याच बरोबूर नागरिकांनी सोशल डिस्टसिंगबाबत ही मैदानात खूना केला आहेत. मात्र रखरखत्या उन्हात व्यवसाय करताना फेरीवाल्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन डोंगरी पोलिसांनी फेरीवाल्यांना मोठ्या छत्र्यांचे वाटप केले आहे.  याबाबतचा  व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे.

कोरोना व्हायरस या संसर्ग रोगाने सध्या सर्वत्र थैमान घातला आहे. देशात सर्वाधित महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली असताना. हा संसर्ग रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे.  त्या पार्श्वभूमिवर २१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॅाकडाॅन जाहिर केले. मात्र नागरिकांमध्ये त्याचा अभाव दिसून आला. हा संसर्ग रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टंसिंग’ ठेवणे गरजेचे असताना ही, नागरिक भाजीमार्केट किंवा दुकानात खरेदी करताना गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेने शहरातील प्रमुख भाजीपाला मार्केट हे मोकळ्या मैदानात हलवण्याचा निर्णय घेतला. महानगरपालिकेने भायखळा, दादर बाजारपेठ अर्धवट बंद ठेवून शहरभरात पाच ठिकाणी भाजी विक्रेत्यांची उभारणी केली.

पुणे आणि नाशिकहून भाजीपाला घेऊन येणारी वाहने सोमैया आणि एमएमआरडीए मैदानावर उर्वण्याचा निर्णय घेतला. ज्याने करून  घाटकोपर ते माटुंगा दरम्यान राहणारे रहिवाशी त्या ठिकाणांहून भाजीपाला घेऊ शकतील, तर वांद्रे ते गोरेगाव दरम्यान राहणाऱ्यांसाठी पालिके एमएमआरडीएच्या मैदानावर विक्रेत्यांना तात्पुरती जागा दिली आहे. दरम्यान, मुलुंड ते घाटकोपर दरम्यान येणारे भाजी विक्रेते मुलुंड जकात नाक्यावर भाज्या विक्री करू शकतील, तर पश्चिम उपनगरातील नागरिकांना दहिसर जकात नाकातून भाजी खरेदी करता येणार आहे. 


या विक्रेत्यांना त्या ठिकाणी कोणतीहि अडचण उद्भवणार  नाही याची काळजी पालिका आणि पोलिसांना घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. मोकळ्या मैदानात उन्हाता त्रास होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच भाजी विक्रेत्यांना शक्य झाल्यास तात्पुरते तंबू अथवा मोठी छत्री देण्यात आलेली आहे. त्यानुसार डोंगरी पोलिसांनी त्या परिसरातील मंडईत विक्रेत्यांना छत्री वाटप करण्यात आल्याचे परिमंडळ १ चे  पोलिस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी सांगितले. 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा