Advertisement

धक्कादायक! मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं सोमवारी पहाटे कोरोनाने दुर्दैवी निधन झालं आहे.

धक्कादायक! मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन
SHARES

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं सोमवारी पहाटे कोरोनाने (coronavirus) दुर्दैवी निधन झालं आहे. मोहन दगडे (५४) असं त्यांचं नाव होतं. ते वाकोला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. 

मोहन दगडे यांना कोरोनाचं निदान झाल्यानंतर वांद्रे येथील बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये त्यांना उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु प्रकृती खालावत गेल्याने पहाटे ३.३० वाजता त्यांचं निधन झालं. आतापर्यंत १०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

दरम्यान, डहाणूचे भाजपचे माजी आमदार व भाजपचे माजी पालघर जिल्ह्याध्यक्ष पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे सोमवारी सकाळी निधन झालं. गेल्या  १० दिवसांपासून धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तर, रविवारी नाशिक महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे करोनामुळं निधन झालं होतं.

हेही वाचा- राज्यात पुढच्या २ दिवसांत लॉकडाऊन लागण्याचे संकेत

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा फैलास अत्यंत वेगाने होत आहे. राज्यात रविवारी ६३२९४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व नवीन ३४००८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण २७८२१६१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५६५५८७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ८१.६५ % झालं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता बेड्स कमी पडू नयेत, यासाठी मुंबईत आणखी ३ ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई उपनगरातील मालाड आणि कांजूरमार्गमध्ये कोरोना केंद्र उभारण्यात येणार असून, शहर भागासाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे. या कोरोना केंद्रांच्या माध्यमातून २००० अतिरिक्त बेड्स उपलब्ध होऊ शकतील. त्यात अतिदक्षता विभागाच्या २०० बेड्सचाही समावेश असणार आहे.

(mumbai police psi mohan dagde from vakola police station died due to coronavirus)

हेही वाचा- मुंबईत नवे ९,९८९ कोरोनाबाधित रुग्ण


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा