Advertisement

'लाल स्टिकर'साठी स्वतंत्र मार्गिका आरक्षित

स्वयंघोषित पास योजनेत लाल रंगातील आरोग्य सेवेशी संबंधित वाहनांना प्राधान्य देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून ठिकठिकाणी विशेष मार्गिकेची व्यवस्था (ग्रीन कॉरिडॉर) केली आहे.

'लाल स्टिकर'साठी स्वतंत्र मार्गिका आरक्षित
SHARES

स्वयंघोषित पास योजनेत लाल रंगातील आरोग्य सेवेशी संबंधित वाहनांना प्राधान्य देण्यासाठी मुंबई पोलिसांनी सोमवारपासून ठिकठिकाणी विशेष मार्गिकेची व्यवस्था (ग्रीन कॉरिडॉर) केली आहे. टोल नाके  किंवा नाकाबंदीदरम्यान ही वाहने खोळंबू नयेत यासाठी काही ठिकाणी स्वतंत्र मार्गिका आरक्षित केली होती.

३ रंगांच्या स्वयंघोषित पासपैकी लाल रंगातील वाहनांची वाहतूक विनाअडथळा व्हावी यासाठी प्राधान्याने उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात ठिकठिकाणी तेथील वाहतुकीचे प्रमाण, उपलब्ध जागेनुसार लाल रंगातील वाहने सुरळीत पुढे सरकू  शकतील या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली होती', असं मुंबई पोलीस दलाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं.

मुलुंड, दहिसर, मानखुर्द येथील ५ टोल नाक्यांवर वाहनांची झाडाझडती सुरू आहे. तसेच निर्बंध संपेपर्यंत अनेक ठिकाणी पोलिसांची कायमस्वरूपी नाकाबंदी ठेवण्यात येणार आहे. मात्र, इथंही ‘कलर कोड’नुसार वाहनांना मोकळा रस्ता मिळावा, यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लाल रंगासह पिवळ्या व हिरव्या रंगाचे वर्तुळाकार कागद चिकटवलेली वाहने मार्गिकेच्या मोकळ्या भागातून सोडण्यात आली.

या कारवाईदरम्यान काही वाहने विनाकारण रस्त्यावर उतरल्याचे आढळले. तर काही चालक, मालकांनी अत्यावश्यक सेवेशी संबंध नसताना वाहनावर रंगीत कागद चिकटवल्याचेही आढळले. या वाहनांवर कारवाई केली गेली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा