Advertisement

Mumbai Rains : बेस्टच्या 'या' बसेसचे मार्ग बदलले, जाणून घ्या बस नंबर

परिणामी बेस्ट बसच्या मार्गात बदल केले आहेत.

Mumbai Rains : बेस्टच्या 'या' बसेसचे मार्ग बदलले, जाणून घ्या बस नंबर
SHARES

मुंबईत शनिवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. परिणामी बेस्ट बसच्या मार्गात बदल केले आहेत. 

सायन रोड नं.२४ येथे पावसाचे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान नियोजित मार्ग बंद केला आहे. व्हाया सायन रोड नं.३ A मार्गे बसमार्ग ७,२२,२५,३०२,३१२,३४१ च्या बसगाड्या वेळ १७.३० पासुन परावर्तित करण्यात आलेल्या आहेत.

दहिसर सबवे येथे पाणी साचल्यामुळे बस मार्ग क्रमांक ए २०८ ,२०७,७०७,मर्यादित ,७२०यांचे प्रवर्तन सुधीर फडके उड्डाणपूल ,बोरिवली मार्गे २०.२० वाजल्यापासून परावर्तित करण्यात आले आहे.

साईनाथ सबवे ,मालाड येथे पाणी साचल्यामुळे बंद केला आहे, 

२०. १५ वाजल्यापासून बस मार्ग क्रमांक ३४५ व ४६० हे गोरेगाव मदिना मंजिल उड्डाण  पुलावरून परावर्तित केले आहेत. तर बस मार्ग क्रमांक २८१ चे प्रवर्तन साईनाथ रोड येथे खंडित करण्यात आले आहे.

आरे कॉलनी ,युनिट नंबर ६ आणि ७ च्या मध्ये झाड पडल्यामुळे बस मार्ग क्रमांक ४५२ च्या बस गाड्या २१.०० वाजल्यापासून आरे मार्केट ,युनिट नंबर ६ येथे खंडित करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! मुंबईकर बेहाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा