Advertisement

Mumbai Rain: बेस्ट बसच्या मार्गात बदल, ट्राफिक ते लोकल ट्रेन संदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर

मंगळवारच्या काही उड्डानांच्या वेळ्या देखील बदलण्यात आल्या आहेत. यासदंर्भात CSMIA नं ट्विट केलंय.

Mumbai Rain: बेस्ट बसच्या मार्गात बदल, ट्राफिक ते लोकल ट्रेन संदर्भात सर्व माहिती एका क्लिकवर
SHARES

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, मुंबईत आज संध्याकाळी 6.00 वाजता 2.04 मीटर एवढी भरती येण्याची अपेक्षा आहे. IMD अधिकारी, के एस होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, कोकण पट्टा आणि जवळपासच्या प्रदेशात जोरदार पाऊस पडत आहे, तर मुंबई आणि ठाण्यात ढगाळ वातावरण राहिल. तसंच मध्यम पावसाची अपेक्षा आहे.

सोमवारी सांताक्रूझमध्ये किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस आणि कमाल ३२.९ अंश सेल्सिअस होते, तसेच सापेक्ष आर्द्रता ९३% होती.

बेस्ट अपडेट

शिवसृष्टी, कुर्लाजवळ इमारत कोसळल्यामुळे, पहाटे 5.05 वाजता कुर्ला (पूर्व) स्थानकाकडे जाताना 5,85,58,59,60 मार्गाच्या बसेस एसटी डेपोऐवजी वत्सलाताई नाईक नगर मार्गे वरच्या दिशेने वळवण्यात आल्या आहेत.

उड्डानं उशीरानं सुरू

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे एक टेम्पो पलटी झाल्याने अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे विमान कंपन्यांमधील कर्मचारी आणि विमानतळावर काम करणारे कर्मचारी वेळेते पोहचू शकले नाहीत. त्यामुळे काही उड्डानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात CSMIA नं ट्विटरवर माहिती दिली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग

पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी पहाटे एक टेम्पो पलटी झाल्याने अनेक तास वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिका-यांनी सांगितले की, औद्योगिक जनरेटर घेऊन जाणाऱ्या टेम्पोचे नियंत्रण सुटले आणि मंगळवारी सकाळी 8.30 च्या सुमारास WEH च्या दक्षिणेकडील लेनवर त्याच्या बाजूला उलटला. वांद्रे येथील हायवेच्या टीचर्स कॉलनी भागात ही घटना घडली.

शिवाय मुंबई-नाशिक महामार्गावरील कॅडबरी पुलावर पावसामुळे चिखल झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तथापि, वाहतूक पोलिस कर्मचारी, अग्निशमन दल आणि आरडीएमसी टीम चिखल साफ करण्यास मदत करतात आणि आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.

लोकल ट्रेन अपडेट

पारसिक बोगद्यातून काल रात्री ८.४५ च्या सुमारास ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यानच्या रेल्वे ट्रॅक क्रमांक ६ वर झाड पडून ब्लॉक झाला. रात्री १०.४५ पर्यंत या मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. झाड हटवल्यानंतर सेवा पुन्हा सुरू झाली.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा