Advertisement

गिरगावमध्ये इमारतीचा लोखंडी परात कोसळल्याने 6 जण जखमी


गिरगावमध्ये इमारतीचा लोखंडी परात कोसळल्याने 6 जण जखमी
SHARES

गिरगावमध्ये खाडिलकर रोड परिसरतील मेहता टॉवरच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना लोखंडी परात कानजी खेतसी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोसळल्याने पाच ते सहा जण जखमी झाले. सकाळी 10.40 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झालेत. उपचारासाठी त्यांना सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गौरी आगमनाच्या दिवशी गिरगावच्या सदाशिव लेन मार्केट परिसरात सकाळी ऐन गर्दीच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. यात कांजी खेतसी इमारतीतले रहिवासी आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांपैकी 5-6 जण जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेक वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. पोलिसांनी इमारतीचा परिसर वाहतुकीसाठी बंद केला असून या दुर्घटनेबाबत व्ही. पी. रोड पोलिस अधिक चौकशी करत आहे.


जखमींची नावे

विनिता शाह (34), आणि त्यांची तीन मुले रिद्धी शाह, वियाना शाह आणि हनिष शाह गंभीर जखमी झाले आहेत. ही मुले आणि त्यांची आई टॅक्सीमधून उतरत असताना लोकंडी परात कोसळल्याने जखमी झाले.

सकाळी 10.45 वाजता कानजी खेतसी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पडलेली लोखंडी परात काढण्यात आल्यानंतर वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला असल्याचे टॅग लेवल 1 चे अधिकारी किशोर गाडिगावर गोवालिया यांनी सांगितले.


डी वॉर्डमध्ये घडना घडल्याचे सागितल्यानंतरही लोकप्रतिनिधी तिथे आले नाही. जखमींना स्थानिकांनीच रुगणालयात नेले.
- वेदक, स्थानिक राहिवासी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा