Advertisement

मलबार हिलमधील रिज रोड दोन वर्षांनंतर पुन्हा खुला

2020 मध्ये 50 दिवसांच्या कालावधीत दोन भूस्खलनानंतर, रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले, त्यानंतर रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

मलबार हिलमधील रिज रोड दोन वर्षांनंतर पुन्हा खुला
SHARES

मलबार हिल (Malabar Hill) भागातील रिज रोड म्हणून ओळखला जाणारा बीजी खेर रोड, अडीच वर्षांच्या अंतरानंतर वीकेंडमध्ये वाहनधारकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला, असे TOI च्या अहवालात म्हटले आहे.

2020 मध्ये 50 दिवसांच्या कालावधीत दोन भूस्खलनानंतर, रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले, त्यानंतर रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

2020 मध्ये भूस्खलन

6 ऑगस्ट रोजी, मुसळधार पावसानंतर, मलबार हिल येथे बीजी खेर रोडवर एन एस पाटकर रोडच्या दिशेने डुंगरवाडीजवळ एक प्रचंड भूस्खलन होऊन पेडर रस्त्याच्या काही भागाचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूस्खलनामुळे एन एस पाटकर रोडचे सुमारे 220 मीटर रस्त्याचे नुकसान झाले आहे.

रस्ता बंद झाल्यामुळे वाळकेश्वर रोड, नेपन्सी रोड आणि एनएस पाटकर रोड या तीन रस्त्यांवरील वाहतूक वळवण्यात आली होती. पुन्हा सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

काम अजून बाकी आहे

बीएमसीने एनएस पाटकर मार्गावर 2021 मध्ये संरक्षण भिंतीचे बांधकाम पूर्ण केले आणि त्यानंतर ते उघडण्यात आले. मात्र, रोडलगतची कामे अपूर्ण राहिली.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, बीजी खेर रोड अजूनही पूर्ण झालेला नाही. लाईट पोल बसवणे, लोखंडी रेलिंग उभारणे ही कामे अद्याप प्रलंबित आहेत.

TOI अहवालानुसार, प्रलंबित काम पूर्ण होण्यासाठी किमान एक महिना लागेल.



हेही वाचा

गेटवे ऑफ इंडिया-बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा ४ फेब्रुवारीपासून सुरू होणार

शिंदे सरकारने मालाडमधल्या 'या' बागेतून टिपू सुलतानचे नाव हटवले

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा