Advertisement

वांद्रेत मुंबईचे पहिले ओपन-एअर ट्रेन कोच रेस्टॉरंट

कालबाह्य झालेल्या ट्रेनच्या डब्याला रेस्टॉरंटमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे.

वांद्रेत मुंबईचे पहिले ओपन-एअर ट्रेन कोच रेस्टॉरंट
SHARES

वांद्रे (bandra) पश्चिम स्थानकावर मुंबईतील (mumbai) पहिले ओपन-एअर मोबाइल रेस्टॉरंट (mobile restaurant) सुरू करण्यात येणार आहे. वापरात नसलेला झालेल्या ट्रेनच्या डब्याला रेस्टॉरंटमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. तसेच या स्थानकाजवळ (station) पार्क केलेल्या ऑटोरिक्षांमुळे होणारी वाहतूक समस्या देखील सोडवण्यास मदत होईल.

वांद्रे स्थानकाजवळ नुकताच वापरात नसलेला ट्रेनचा डबा ठेवण्यात आला. या डब्याचे लवकरच इनडोअर आणि आउटडोअर आसनांसह रेस्टॉरंटमध्ये रूपांतर केले जाईल. तसेच म्युझिक इव्हेंटसाठी स्टेजही उभारण्यात आला आहे. ओपन एअर थीम डोळ्यासमोर ठेवून हवेशीर जागी बसण्याची सोय देखील करण्यात आली आहे. 

नवीन रेस्टॉरंट उभारण्यासाठी जुनी रचना पाडण्यात आली आहे. यामध्ये मल्टीफंक्शनल स्टोअर, फार्मसी आणि एटीएम ब्लॉक यांचा समावेश आहे. रेस्टॉरंटच्या जागी सध्या कचऱ्याचा ढिगारा आहे, तो साफ करून रेस्टॉरंट तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

यामुळे स्टेशनच्या मालमत्तेवर अतिक्रमण होण्यापासून आळा बसेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

प्लॅटफॉर्म 1 च्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील जागा देखील आर्ट गॅलरीत रुपांतरित करण्याचा विचार केला जात आहे. 

वांद्रे स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी व्यवस्थापित करण्यासाठी अलीकडे पावले उचलण्यात आली आहेत. अतिक्रमण करणारे विक्रेते हटवण्यात आले आहेत. इतर उपाययोजनांमुळे गर्दी कमी झाली आहे. 

मात्र, ऑटोरिक्षांमुळे होणारी वाहतूक कोंडी हे आव्हान कायम आहे. या प्रकल्पामुळे स्थानकाचे सांस्कृतिक वातावरण सुधारून परिसरात सुव्यवस्था येईल.



हेही वाचा

वसई-नालासोपारा : हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा पराभव

तूर्तास... पराभवानंतर राज ठाकरे म्हणाले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा