मुनगंटीवारांनी केलं चौकफलकाचं अनावरण

 Andheri
मुनगंटीवारांनी केलं चौकफलकाचं अनावरण

अंधेरी पूर्व - वॉर्ड क्रमांक 80 येथील गुंदवली हायवेजवळ 26 डिसेंबरला रात्री अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विश्वकर्मा चौकाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. महापालिका निवडणूक जवळ येताच भाजपाने गुजराथी, बिहारी, मद्रासी मतदारांकडे मोर्चा वळवला आहे, हे या समारंभात पुन्हा एकदा दिसलं. सोहळ्याला उत्तर-पश्चिम जिल्हा अध्यक्ष अमित साटम आणि अभिजित सामंतही उपस्थित होते. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा वॉर्ड क्रमांक 80मधील कार्यालयासही उद्घाटन सोहळ्यानंतर भेट दिली.

Loading Comments