Advertisement

वादळाची अफवा पसरवणारे जाणार जेलमध्ये ?


वादळाची अफवा पसरवणारे जाणार जेलमध्ये ?
SHARES

मुंबई शहरात वादळाचा धोका, दुपारी ३ वाजता मुंबईत वादळ धडकणार, सी लिंक आणि पेडर रोड बंद होणार, अशा अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणाऱ्याविरोधात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.



वादळाच्या अफवा या समाज माध्यमातून पसरवण्यात आल्या. हा संदेश पसरवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील प्रकरण १० तील कलम ५४ अंतर्गत खोटी माहिती देऊन नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याबद्दल कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, असे अजोय मेहता यांनी सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत. त्यामुळे जर पोलिसांनी ही अफवा पसरवणाऱ्याचा शोध घेतला तर दोषी व्यक्तीला १ वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा