Advertisement

कोरोनाबाधीताच्या सेवेसाठी नायर रुग्णालय सज्ज


कोरोनाबाधीताच्या सेवेसाठी नायर रुग्णालय सज्ज
SHARES

कस्तुरबा आणि सेव्हन हिल्स या रुग्णालयांवरील कोरोना रुग्णांचा वाढलेला भार कमी करण्यासाठी आता नायर रुग्णालयाचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईतील कोरोनाचे हॉट स्पॉट वाढत असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या रुग्णांमुळं रुग्णालयं कमी पडू नयेत, यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाचा समावेश महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांत केला जातो. आता हे रुग्णालय पूर्णत: कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे. नजीकच्या एच इमारतीमध्ये २५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णालयात व्हेंटिलेंटर व ऑक्‍सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे. पीपीई किट व मास्कचा पुरेसा साठा ठेवण्यात येणार आहे. 

रुग्णालयात काम करणारे व कोरोना नसलेल्या ठिकाणी काम करणारे डॉक्‍टर, वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांची पथकं वेगळी असतील, असे सांगण्यात आले. नायर रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयही असल्यानं नव्या प्रवेशांवरही परिणाम होणार आहे. जूनमध्ये परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचाही प्रश्‍न उद्‌भवणार आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा