Advertisement

महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर


महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी दिड महिन्याचे मोफत क्रिकेट प्रशिक्षण शिबीर नॅशनल क्रिकेट क्लब आणि रूट मोबाईल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. दिड महिन्याच्या या शिबीरामधून 14 वर्षांखीलील 20 मुले आणि 16 वर्षांखालील 20 मुलांची निवड प्रशिक्षकांमार्फत केली जाणार आहे. या दोन्ही वयोगटातील मिळून 40 मुलांना वर्षभर नॅशनल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मोफत क्रिकेट प्रशिक्षण दिले जाणार आहे.

झोपडयांमध्ये राहणाऱ्या तसेच गल्लीबोळात खेळणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक मुलांमध्ये क्रिकेट खेळण्याबाबत टॅलेंट असूनही आर्थिक क्षमता नसल्याने आणि क्रिकेट या खेळाचे प्रशिक्षण न मिळाल्यामुळे ही मुले मागे राहतात. याच गोष्टीचा विचार करून नॅशनल क्रिकेट क्लब आणि रूट मोबाईल कंपनीतर्फे यावर्षी 19 ते 21 एप्रिल असे तीन दिवस खेळाडूंची निवड केली जाणार असून, त्यानंतर दीड महिना म्हणजेच 25 मे पर्यंत क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात निवड झालेल्या 40 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन बीसीसीआयच्या इनडोअर क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याची संघी दिली जाणार आहे.

मुंबई क्रिकेट क्लबचे कोच शेखर भोर, नॅशनल क्रिकेट क्लबचे कॅप्टन प्रसाद मांजरेकर, तसेच इतर अनुभवी प्रशिक्षकांमार्फत निवड झालेल्या खेळाडूंना क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. क्रॉस मैदान या शासकीय मैदानावर या मुलांना क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार असून, शासनानेही या उपक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. अधिक माहितीसाठी जितेंद्र कनोजिया (8433300074) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नॅशनल क्रिकेट क्लब आणि रूट मोबाईल कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा