Advertisement

नवी मुंबईतल्या शेतकरी विद्यालयातील १८ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह

नवी मुंबईतील घणसोली परिसरात असलेल्या एका शेतकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

नवी मुंबईतल्या शेतकरी विद्यालयातील १८ विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह
(Representational Image)
SHARES

नवी मुंबईतील घणसोली परिसरात असलेल्या एका शेतकरी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मागील २ दिवसात या शाळेतील १८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे विद्यार्थी ८ ते १२ या वयोगटातील असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता धोका आणि विद्यार्थ्यांच्या सरक्षेसाठी ही शाळा ७ दिवस बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर १८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंतेत भर पडली आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो मुलगा याच शाळेत येत होता. दरम्यान, या परदेशी व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी विद्यालयातील ८०० विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली आहे. घरी राहिलेल्या विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट मनपा घरी जावून करणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या १८ विद्यार्थ्यांवर वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोरोना सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत.

सर्व मुलांची प्रकृती ठीक आहे. या शेतकरी विद्यालयात ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यालयातील १८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं प्रशासन चिंतेत आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांची आज कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा