गटरांच्या कामाचा शाळकरी मुलांना त्रास

 Nehru Nagar
गटरांच्या कामाचा शाळकरी मुलांना त्रास

नेहरु नगर - गेल्या 15 दिवसांपासून कुर्ला नेहरुनगर येथे अनेक ठिकाणी गटरांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे या गटाराच्या खोदकामासाठी काढलेली माती ही रस्त्यालगतच टाकली आहे. याचा त्रास शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याच परिसरात पालिकेची आणि स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी अशा दोन शाळा आहेत. त्यामुळे सकाळ, दुपार आणि सायंकाळी याठिकाणी मोठी गर्दी असते. अशातच हे मातीचे ढिगारे रस्त्यालगतच असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीही होते. त्यामुळे निदान हे मातीचे ढिगारे तरी कंत्राटदाराने बाजूला करावेत अशी मागणी या वेळी परिसरातील स्थानिक रहिवाशी नितीन महाडिक यांनी केली आहे.

Loading Comments