Advertisement

लसीकरणासाठी पालिकेचा भारतीय जैन संघटनेसोबत करार

आता स्वयंसेवी संस्था देखील लसीकरण मोहिमेचा एक भाग बनतील.

लसीकरणासाठी पालिकेचा भारतीय जैन संघटनेसोबत करार
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शहरातील दररोज लसीकरण संख्या वाढवण्याची योजना आखत आहे. आता स्वयंसेवी संस्था देखील लसीकरण मोहिमेचा एक भाग बनतील.

पालिकेनं ५० पेक्षा जास्त बेड असलेल्या नर्सिंग होम्सना लसीकरण केंद्र २४ ×७ खुल्या ठेवण्यास परवानगी दिली आहे. जनतेचा प्रतिसाद जाणून घेण्यासाठी अनेक रुग्णालयांनी संध्याकाळपर्यत लसीकरण मोहीम लांबवली आहे. परंतु अद्याप त्यांच्याकडून २४ तास लसीकरणाची सुविधा सुरू केलेली नाही.

प्रशासकिय संस्थेनं लसीकरणात मदत करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) सह सामंजस्य करार केला आहे.

याव्यतिरिक्त, बीजेएस नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लसीकरण केंद्रांमध्ये मदत डेस्क स्थापित करेल. लसीकरण अधिकारी आणि प्राप्तकर्त्यांमध्ये समन्वय साधेल. तसंच झोपडपट्ट्यांमध्ये लसी देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू होईल. बीजेएस लसीकरणानंतर पाठपुरावा देखील करेल. ते जनजागृती करण्यासाठी मोबाइल व्हॅनचा वापर करेल.

यापूर्वी, एनजीओनं पालिकेबरोबर मागील वर्षात उच्च जोखमीच्या संपर्कांची चाचणी, उपचार आणि शोध घेण्यात काम केलं आहे. या आठवड्यापासून, नायर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, बीकेसी जंबो सेंटर, मुलुंड जंबो सेंटर आणि दहिसर जंबो सेंटर इथं कोवॅक्सिन देण्यास सुरुवात करतील.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा