Advertisement

अखंडीत पाणीपुरवठ्यासाठी जलवितरणाचे पुनर्नियोजन करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

महानगरपालिका, सिडको व एमआयडीसी या तिन्ही प्राधिकरणांनी परस्परांशी समन्वय राखून सगळीकडे समाधानकारक पाणीपुरवठा राहील याविषयी जलवितरणाचे पुनर्नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले.

अखंडीत पाणीपुरवठ्यासाठी जलवितरणाचे पुनर्नियोजन करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
SHARES

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एमआयडीसीमार्फत महानगरपालिकेस वितरीत होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. त्यामुळे  दिघा, ऐरोली, राबाडे तसेच इतर काही भागांतून लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या.   पाणीपुरवठ्याविषयी मागील काही दिवसांपासून या वाढलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिकेसह एमआयडीसी व सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी पाणीपुरवठा अखंडीत व योग्य दाबाने रहावा यासाठी जलवितरण प्रक्रियेचे निरीक्षण करून जलवितरणाचे पुनर्नियोजन करण्याचे निर्देश दिले.

बैठकीला नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व कार्यकारी अभियंता  मनोहर सोनावणे, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर.जी. राठोड, उप अभियंता संतोष कळसकर तसेच सिडकोचे मुख्य अभियंताराजेंद्र दहाटकर व अधिक्षक अभियंता पाणीपुरवठा प्रणिक मूल हे प्रत्यक्ष बैठकीत त्याचप्रमाणे एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ हे वेब प्रणालीव्दारे उपस्थित होते.

पाणी ही जीवनावश्यक बाब असून त्याबाबत लोकांच्या भावना तीव्र असतात हे लक्षात घेऊन महानगरपालिका, सिडको व एमआयडीसी या तिन्ही प्राधिकरणांनी परस्परांशी समन्वय राखून सगळीकडे समाधानकारक पाणीपुरवठा राहील याविषयी जलवितरणाचे पुनर्नियोजन करावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. पुनर्नियोजन केल्यानंतर झालेल्या परिणांमाचाही नियमित आढावा घ्यावा असेही निर्देशित करण्यात आले.  

मागील महिन्यापासून पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असल्याचे नमूद करीत एमआयडीसी मार्फत 1 जुलैपासून झालेल्या दिवसनिहाय पाणीपुरवठ्याचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. याविषयी एमआयडीसीमार्फत मांडण्यात आलेल्या पूर परिस्थिती व शटडाऊन स्थितीमुळे पाणीपुरवठ्यामध्ये झालेली अनियमितता लक्षात घेतली तरी त्यामुळे नागरिकांना जाणवलेली पाणी टंचाई लक्षात घेऊन या 54 दिवसात सरासरीपेक्षा कमी पुरवठा झाल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले व हा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी तातडीने नियोजन करावे असे निर्देश दिले.

सिडकोच्या काही भागात महानगरपालिकेच्या मोरबे धरणाचे पाणी दिले जात आहे. महापालिका व सिडको यांच्यामार्फत दैनंदिन पाणीपुरवठ्याची टॅपींगच्या ठिकाणी घेतली जाणारी नोंद एकाच वेळी घेतली जावी व त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सॲपव्दारे परस्परांशी संपर्क राखावा असेही आयुक्तांनी यावेळी आदेश दिले.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा