Advertisement

रेल्वे अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरवर लाखोंची उधळपट्टी, सुविधा मात्र नाहीत!

सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर १൦८ची रुग्णवाहिका असतानाही रेल्वेची रुग्णवाहिका उभी केली जाते. या रुग्णवाहिकेच्या ड्राइवरला १൦८ रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरच्या दुप्पट पगार दिला जातो. इतकंच नाही, तर या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर, आपातकालीन साधनंही उपलब्ध नाहीत. तरीही, रेल्वे अशा रुग्णवाहिकांवर २൦൦६ पासून लाखो रुपये खर्च करते.

रेल्वे अॅम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरवर लाखोंची उधळपट्टी, सुविधा मात्र नाहीत!
SHARES

सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेकडून उभ्या केलेल्या रुग्णवाहिकेवर लाखोंची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी केला आहे. शिवाय, या रुग्णवाहिकेत कसल्याही प्रकारची सुविधा देण्यात आलेली नाही. रुग्णवाहिकेत फक्त ड्रायव्हर असतो, डॉक्टर किंवा वैद्यकीय सेवेसाठी कोणतीही व्यवस्था या रुग्णवाहिकेत नाही, अशी माहिती आरटीआयमध्ये उघड झाली आहे.


रेल्वे रुग्णवाहिकेची गरज काय?

सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर १൦८ची रुग्णवाहिका असतानाही रेल्वेची रुग्णवाहिका उभी केली जाते. या रुग्णवाहिकेच्या ड्राइवरला १൦८ रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरच्या दुप्पट पगार दिला जातो. इतकंच नाही, तर या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर, आपातकालीन साधनंही उपलब्ध नाहीत. तरीही, रेल्वे अशा रुग्णवाहिकांवर २൦൦६ पासून लाखो रुपये खर्च करते ही माहितीही माहिती अधिकारात देण्यात आली आहे.



ड्रायव्हरचा पगार ३९ हजार!

रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अपघातप्रसंगी उपचारांसाठी रुग्णवाहिका तैनात आहे. २००६ सालापासून ही रुग्णवाहिका सीएसएमटी येथे कार्यरत आहे. या रुग्णवाहिकेत डॉक्टरांसह कोणत्याही प्रकारच्या आपातकालीन वैद्यकीय सुविधा नाहीत. केवळ मध्य रेल्वेची ही रुग्णवाहिका असल्याने रेल्वे प्रशासनाला रुग्णवाहिकेच्या चालकाला दरमहा ३९ हजार २०० रुपये पगारापोटी खर्च करावे लागत आहेत. या रुग्णवाहिकेच्या चालकांची ड्युटी केवळ ९ तासांची आहे.


सुविधा नसूनही रेल्वेची मेहेरबानी?

याउलट २०१४ सालापासून राज्य सरकारने डॉक्टरांसह सर्व वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली (१०८) रुग्णवाहिका सीएसएमटी स्थानकात सुरू केली. या रुग्णवाहिकेच्या चालकाला केवळ १४ हजार रुपये पगार असून या रुग्णवाहिकेच्या चालकाची ड्युटी १२ तासांची आहे. मुळात वैद्यकीय सुविधा नसलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकावर मध्य रेल्वे का मेहेरबानी दाखवते? असा प्रश्न समीर झवेरी यांनी उपस्थित केला आहे. क्वचित प्रसंगी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यास हाकेच्या अंतरावर असलेल्या सेंट जॉर्ज रुग्णालयाची रुग्णवाहिकाही उपलब्ध होते.


कारवाईची मागणी

रेल्वे सतत तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. असं असताना देखील अशा खर्चामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी समीर झवेरी यांनी केली आहे.



हेही वाचा

मुंबईत महापालिकेच्या बाईक अॅम्ब्युलन्स नाहीच!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा