वडाळा - मध्य-हार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती लोकसंख्या पाहता या मार्गावर 12 डब्यांच्या लोकल सुरु करण्यात आल्या. मात्र प्लॅटफॉर्मवर छप्पर नसल्याने प्रवाशांना भरपावसात छत्र्या घेऊन लोकलची वाट पहावी लागते. प्लॅटफॉर्मवर छप्पर नसल्याचा जास्त त्रास हा महिलांना होत आहे. ऐन पावसात छत्री सांभाळत धावत लोकल पकडण्याची जीवघेणी कसरत त्यांना रोज करावी लागते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर छप्पराचे काम पूर्ण करावे अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे. "छप्पराचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल",असे आश्वासन जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिले आहे.