Advertisement

लॉकडाऊनमुळं फ्लेमिंगोच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ


लॉकडाऊनमुळं फ्लेमिंगोच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ
SHARES

लॉकडाऊनच्या काळात मुंबई महानगरात स्थलांतरीत फ्लेमिंगो पक्षांच्या संख्येत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सुमारे दीड लाख फ्लेमिंगो संचार असल्याचा दावा पक्षी प्रेमींनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात मागील वर्षापेक्षा २५ टक्क्यांनी फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाल्याचा अंदाज आहे. लॉकडाऊनमुळं निसर्गातील मानवी हस्तक्षेप कमी झाल्यानं फ्लेमिंगोचा मुक्त संचार सुरू आहे.

मुंबई महानगरातील प्रदुषण या काळात कमी झालं आहे. त्यामुळं मानवी वस्तीजवळ फ्लेमिंगोचं दर्शन घडत आहे. मुंबईतील दलदली क्षेत्र (वेटलॅंड) लॉकडाऊनमध्ये सुरक्षित झाली आहेत. त्यामुळे या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांना खाद्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात २५ टक्के फ्लेमिंगोच्या अधिवासात वाढ झाली आहे.

दरवर्षी १ लाख २५ ते ३० हजार फ्लेमिंगो नोंद होते. या वर्षी ती सुमारे दीड लाखाहून अधिक नोंद होण्याची शक्यता आहे. शिवडी, ठाणे खाडी ते जेएनपीटी, उरण पर्यंत फ्लेमिंगो आढळतात. तसंच, भांडूप पंपिंग स्टेशनजवळ ही फ्लेमिंगोचे दर्शन झाले. लॉकडाऊनमुळे कंपन्या बंद आहेत. त्यामुळे सांडपाणी समुद्रात सोडले जात नाही. त्यामुळं प्लेमिंगो पक्ष्यांना खाण्यासाठी आवश्यक शेवाळे दलदलतीत व खाडीत या दरम्यान मोठ्या प्रमाणात उगवले आहे.

नवी मुंबई व जेएनपीटी येथील दलदलीच्या जागेत बांधकाम सुरू असते. त्यामुळं पक्ष्यांच्या अधिवासामध्ये अडथळे निर्माण होतात. पण लॉकडाऊनमुळं सर्वच काम बंद आहेत. शांतता व मानवी वावर नसल्यानं फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा