Advertisement

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू

बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बस दरीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू
SHARES

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस (Private bus) दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये 40 ते 45 लोक होते. यामधील 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

अद्याप 15 ते 20 प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

या बसमध्ये एकूण 40 ते 45 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामधील सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मदतकार्य सुरू असून जखमींना खोपोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. 

स्पॅाटवर अपघातग्रस्ताच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टिम आहे.

खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते.

एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे

1) आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई.

2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई.

3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई.

4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई.

5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई.

6) आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई

7) ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड.

8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई.

9) रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई

10) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई

11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई.

12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई

13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई

14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई.

15) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई.

16) दिपक विश्वकर्मा, वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई

17) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई.

खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मधील जखमींची नावे

१) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई.

२) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई

३) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई

४) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार.

५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई

६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई

७) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई

८) ओम मनीष कदम, १८वर्ष, गोरेगाव, मुंबई.

९) मुसेफ मोईन खान,वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई

खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीची नावे:-

१) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष, खोपोली,रायगड.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा