Advertisement

गोरेगाव : NNP तील IT Park जवळ रस्ता खचला, एक बाजू वाहतुकीसाठी बंद

गोरेगाव नागरि निवारा परिषद इथला हा परिसर आहे. परिसरात सध्या भितीचे वातावरण आहे.

गोरेगाव : NNP तील IT Park जवळ रस्ता खचला, एक बाजू वाहतुकीसाठी बंद
SHARES

गोरेगाव  इथे IT Park जवळ नाल्याला लागून असलेला रस्ता खचला आहे. यामध्ये रस्त्याला लागूनच असलेला एक ट्रक धसला होता. पण ट्रकला  मुळे IT park ची एक बाजू बंद करण्यात आली आहे. 

नाल्यासगतच उभा असलेला ट्रक धसला. या रस्त्यालाच लागून अनेक खाण्याचे फूड स्टॉल पार्क असतात. यासोबतच इतर गाड्याही पार्क असतात. या घटनेवेळी उपस्थितांना मोठा आवाज आला. नागरिकांनी तात्काळ गाड्या बाजूला काढल्या. पण तोपर्यंत ट्रक रस्त्यात धसला होता. घाबरलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. 

इन्फिनिटी पार्क येथे रस्ता खचल्यामुळे आपत्कालीन विभाग यांच्या निर्देशानुसार बस मार्ग क्रमांक ६४६ चे प्रवर्तन अपना बाजार येथे 9.40 वाजल्यापासून खंडित करण्यात आले आहे.

खचलेला रस्त्याचा भाग हा नाल्याजवळील असल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. जवळच आयटी पार्क आणि नागरी निवारा परिषदेच्या काही इमारती आहेत. मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून एक बाजू बंद करण्यात आली आहे. 

खचलेला भाग हा नाल्या जवळच आहे. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्याला लागून असलेला रस्ता रचल्याचे बोलले जात आहे. 

सध्या पाऊस असल्याने तात्काळ काही कामाला सुरुवात करता येत नाही आहे. पण या भागात बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. गाड्यांना तसेच रहिवाशांना देखील रस्ता रहदारी साठी बंद करण्यात आला आहे. 

मंगळवारी सकाळी पालिका पूर्ण परिसराची पाहणी करेल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. सध्या पावसामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काम करणे अधिक धोकादायक ठरू शकते. 

नाल्याला लागून नागरि निवारा परिषदेच्या काही इमारती आहेत. IT park ला जाण्यासाठी या रोजचा वापर होतो. पण सध्या या रोजची एक बाजू बंद करण्यात आली आहे. सकाळी पाहणी केल्यानंतरच रोड पूर्ण बंद ठेवायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा