Advertisement

कांद्याच्या दरात घसरण


कांद्याच्या दरात घसरण
SHARES

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात प्रति किलो कांदा दर ४५ रुपयांपर्यंत गेले होते. किरकोळ बाजारात तर ५० रुपयांनी कांदा विकला जात होता. त्यात घट झाली असून दर स्थिरावले आहेत.  एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याला १८ ते २० रुपये प्रति किलो दर आहे. मागील आठवड्यात २५ ते ३० रुपये दर होते.

पावसामुळे या वर्षी उत्पादन कमी झाल्यानं नवीन कांदा आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांदा दरात अधूनमधून वाढ होत आहे. फेब्रुवारीमध्ये किरकोळ बाजारात कांदाच्या भावानं पन्नाशी पार केली होती. तर घाऊक बाजारात ४० ते ४५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. मागील आठवड्यात दरात घसरण होत दर २५ ते ३० रुपयांपर्यंत आले होते.

सध्या एपीएमसी घाऊक बाजारात ९५ कांदा गाड्या दाखल होत आहेत. बाजारात जुना गावरान कांदाही येत आहे. तसेच परदेशी, गुजरात येथूनही आवक होत आहे. त्यामुळे दरात सात ते आठ रुपयांची घसरण झाली असून दर १८ ते २० रुपये प्रति किलो आहेत. नाशिक आणि पुणे बाजारात कांद्याचे दर १० ते १५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा