Advertisement

केवळ 735 ईव्ही एसी बसेसच बेस्टच्या ताफ्यात दाखल

उन्हात तसेच पावसात तासनतास बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणे बसथांबे आणि स्थानकांची दुरवस्था, त्यावरील अतिक्रमणे तसेच अपुरा बसताफा यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

केवळ 735 ईव्ही एसी बसेसच बेस्टच्या ताफ्यात दाखल
SHARES

बेस्ट ओलेक्ट्रा कंपनीकडून 4,500  सिंगल डेकर वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बसेस (EV buses) भाडेतत्त्वावर घेणार होती. मात्र आतापर्यंत केवळ 735 बसेसच ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

तीन वर्षांनंतरही बस पुरवठा पूर्ण करण्यात कंपनीला अपयश आले आहे. यामुळे बेस्टच्या (best) ताफ्यात अपेक्षित वाढ झाली नसल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत.

मुंबईतील (mumbai) बेस्ट प्रवाशांना वेळेत बेस्ट बस येईल, याची प्रतीक्षा आजही कायम आहे.

उन्हात तसेच पावसात तासनतास बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणे बसथांबे आणि स्थानकांची दुरवस्था, त्यावरील अतिक्रमणे तसेच अपुरा बसताफा यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

बेस्टने 23 मे 2023 रोजी 2,100 एसी इलेक्ट्रिक सिंगल डेकर बस पुरविण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते.

या करारानुसार आतापर्यंत सर्व बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ 686 बसेस दाखल झाल्या आहेत.

तसेच त्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी याच कंपनीला आणखी 2,400 एसी इलेक्ट्रिक बसेस पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले.

सध्या बेस्टच्या ताफ्यात सुमारे 2,800 बस आहे. त्यापैकी 249 बस स्वमालकीच्या, तर उर्वरित भाडेतत्त्वावरील आहेत. याउलट 2022-23 मध्ये बेस्टकडे 3,569 बस होत्या.

त्यामध्ये 1,881 स्वमालकीच्या आणि 1,688 भाडेतत्त्वावरील बसेसचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत स्वमालकीच्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.



हेही वाचा

'भाजप आमदाराचा BMC च्या क्रीडा संकुलावर कब्जा'; आदित्य ठाकरेंचा आरोप

MARD चा संप तात्काळ मागे घ्या; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा