Advertisement

मुंबईच्या सातही धरणात इतकाच पाणीसाठा

राज्य सरकारने अप्पर वैतरणा धरणातील 93 हजार 500 तर भातसा धरणातील 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला आहे.

मुंबईच्या सातही धरणात इतकाच पाणीसाठा
SHARES

मुंबईला (mumbai) पाणीपुरवठा  करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. 21 जून रोजी धरणात फक्त 8.68 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे 23 जूनपासून राखीव पाणीसाठ्यातून मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. 

जून महिन्याचे 21 दिवस झाले तरी पावसाची (rain) ओढ कायम आहे. सातही धरणातील पाण्याची पातळीने तळ गाठल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात 21जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 8.68 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

राज्य सरकारने अप्पर वैतरणा धरणातील 93 हजार 500 तर भातसा धरणातील 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला आहे.

सात धरणातील व राखीव पाणीसाठा जुलै मध्यापर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्याने अखेर राखीव पाणीसाठा वापरण्याची वेळ मुंबई महापालिकेवर (bmc) आली आहे.

येत्या मंगळवारपासून राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरु करणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज 4,100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.

तसेच वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणात 1 लाख 25 हजार 525 दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे.

15 मे पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र एल नीनोचा प्रभाव असल्याने यंदा पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज नाही.

तसेच त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून पाणी कपातीत 1 जुलैपासून आणखी 10 टक्के अशी 20 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.



हेही वाचा

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण: साक्षीदारांच्या पॉलीग्राफ चाचणीला मंजुरी

मुंबईकरांवर आणखी 10% पाणी कपातीचे संकट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा