Advertisement

गटारामुळे अपघाताची शक्यता


गटारामुळे अपघाताची शक्यता
SHARES

जोगेश्वरी - मुख्य रस्त्यावरील जंक्शन जवळ असलेल्या रस्त्यावर गटाराचे झाकण तीन ते चार दिवस झाले खचले आहे. मध्यभागी झाकण खचल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होतेय. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरून हजारो वाहने अंधेरी, वांद्रे, बोरिवली या मार्गावरून जोगेश्वरी जंक्शनमधून जातात. वाहनं वेगात असल्यानं खचलेल्या झाकणामुळे अपघातही होऊ शकतो. यासंदर्भात पालिकेकडे तक्रार करण्यात आलीय. पण पालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे अपघात झाल्यावरच पालिका जागी होणार का? असा संतप्त प्रश्न वाहन चालकांनी केलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा