Advertisement

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा- उद्धव ठाकरे

मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालक आणि डाॅक्टरांना केलं.

लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा- उद्धव ठाकरे
(Representational Image)
SHARES

मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पालक आणि डाॅक्टरांना केलं. राज्यातील ६ हजार बाल रोग तज्ज्ञांना कोविडविषयक टास्क फोर्सने मार्गदर्शन केलं. मुलांमधील कोविडशी संबंधित मानसिक दुष्परिणामांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे हा कार्यक्रम बाल रोग तज्ज्ञांव्यतिरिक्त इतर संस्था व संघटनांमधील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स आणि हजारो सर्वसामान्य दर्शकांनी विविध माध्यमातून पाहिला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तिसरी लाट येईल का? आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल? याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिलं पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ते पुढे म्हणाले की, गेल्या रविवारीच मी राज्यातील (maharashtra) सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत करतो. रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावं आणि काय करू नये ते नेमकं आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावं, योग्य मार्गदर्शन करावं. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या.

हेही वाचा- COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

उपचारांबाबत शंकांचं समाधान

सुरुवातीला टास्क फोर्सने सादरीकरण केलं. कोविडग्रस्त मुलांना स्तनपान, अंगणवाडी सेविकांची भूमिका, यावेळी त्यांनी मुलांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग कसा ओळखावा, सीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नये, मुलांमध्ये सहव्याधी फारशा नसतात, पण ज्यांच्यात आहेत त्यांना कसे उपचार करावेत, कोविडग्रस्त मुलांची काळजी घेताना पालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, मास्क, हात धूत राहणे ही काळजी कशी घ्यावी, हे सांगण्यात आलं.

तसंच घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविडग्रस्त (coronavirus) मुलांपासून कसं दूर ठेवावं, कोविडमुळे मुलांमधील फुफ्फुसाचा संसर्ग, मधुमेही टाईप एक मुलांच्या बाबतीत उपचार, मुलांसाठी ६ मिनिटे वॉक टेस्ट कशी करावी, घरी विलगीकरणातील मुलांच्या उपचाराचा प्रोटोकॉल कसा असावा, अशा मुलांना कोविड काळजी केंद्रात घेऊन जाण्याची नेमकी परिस्थिती कशी ओळखायची, कोविडमधील मुलांना खाण्यापिण्याची काय पथ्ये असावीत, अशा मुलांना बीसीजी व इतर लसींच्या बाबतीत काय करावं, मुलांमध्ये म्युकरमायकोसीसची किती शक्यता असते, मुलांमध्ये हायपोक्सिया होतो का? मुलांना नेमकी कोणती लस द्यावी, लहान मुलांना मास्क घालावा किंवा नाही, याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा