Advertisement

जंगलात हरवलेल्या एकाच कुटुंबातील 8 जणांची सुटका

मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे ते डोंगराकडे जाणाऱ्या जंगलात हरवले.

जंगलात हरवलेल्या एकाच कुटुंबातील 8 जणांची सुटका
SHARES

कुशिवलीतील पाच पीर डोंगराजवळील जंगलात अडकलेल्या कुटुंबाची पनवेल (panvel) पोलिसांनी सुटका केली आहे. दोन तासांच्या खडतर प्रयत्नानंतर एकाच कुटुंबातील चार मुलांसह आठ जणांची सुटका (rescue) करण्यात आली आहे. 

नेरुळ येथील एका कुटुंबाने रविवारी माताजी टेकडी या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देण्याचा निर्णय घेतला. ज्यात चार मुले, तीन पुरुष आणि एक महिला असा समावेश होता. यानंतर, त्यांनी टेकडीच्या मागे असलेल्या पाच पीर पर्वताकडे जाण्याचे ठरवले. पण मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे ते डोंगराकडे जाणाऱ्या जंगलात हरवले.

पोलिसांना (police) दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9.30 वाजता कुटुंबीयांनी चढाईला सुरुवात केली. मात्र, दुपारच्या सुमारास ते हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मदतीसाठी बोलावले.

आपत्ती कक्षाने पनवेल शहर पोलिसांना या संकटाची माहिती दिली. दुपारी 3.30 च्या सुमारास, आठ पोलिस कर्मचारी आणि भूभागाशी परिचित असलेले पाच गावकरी हरवलेल्या कुटुंबाला शोधण्यासाठी निघाले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील केदार म्हणाले, “आम्ही फोनवर कुटुंबाशी सतत संपर्कात होतो. तसेच गावकऱ्यांनी दिलेली मदत शोधकार्यात उपयोगी पडली.”

पोलिसांनी सांगितले की, हा मार्ग धोकादायक नव्हता आणि तेथे पाणीही साचले नव्हते. डोंगरावरून खाली उतरताना धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने कुटुंब वाट चुकले आणि जंगलात हरवले. संध्याकाळी 6.30 वाजता या कुटुंबाला सुखरूप परत आणण्यात आले.



हेही वाचा

मुलुंड : हिट अँड रन प्रकरणात ऑडी कार चालकाला अटक

मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट, 24 तासांत 200 मिमी पाऊस

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा