Advertisement

लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये एक्स्प्रेसचं इंजिन स्टॉपरवर धडकलं


लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये एक्स्प्रेसचं इंजिन स्टॉपरवर धडकलं
SHARES
Advertisement

लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पवन एक्स्प्रेसचे इंजिन रेल्वे रुळावरून घसरत थेट स्टॉपरवर जाऊन आदळलं. सोमवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडल्याच समजत आहे.


जीवितहानी नाही

लोकमान्य टिळक टर्मिनस येथील फलाटावर प्रवेश करत असताना इंजिन स्टॉपरवर जाऊन आदळलं. सुदैवाने या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. परंतु, या घटनेमागचं नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

घटनास्थळी रिलीफ इंजिन दाखल झाल्यानंतर इंजिन हटवण्यात आलं. या घटनेमुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचं समजतं.

संबंधित विषय
Advertisement