Advertisement

पेट्रोल २१ पैशाने तर डिझेल ११ पैशाने स्वस्त


पेट्रोल २१ पैशाने तर डिझेल ११ पैशाने स्वस्त
SHARES

मागील काही दिवसांच्या वाढीनंतर गुरूवारी पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले अाहेत. मुंबईत पेट्रोलचा दर २१ पैशाने कमी झाला अाहे. तर डिझेल ११ पैशाने स्वस्त झाले अाहे. मुंबईत पेट्रोलचा भाव अाता प्रति लिटरला ८८.०८ तर डिझेलचा दर ७९.२४ रुपयांवर अाला अाहे.

पंतप्रधानांची बैठक

जवळपास २ अाठवड्यांनंतर पेट्रोल, डिझेलचे दर घटले अाहेत.  काही दिवसांपूर्वी सरकारने  पेट्रोल अाणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी दीड रुपये कमी केली होती. त्यानंतर तेल कंपन्यांनी १ रुपये दर कमी करून दिलासा दिला होता. यापाठोपाठ भाजपाप्रणित काही राज्यांमध्ये अडीच रुपये व्हॅट कमी करण्याची घोषणा करण्यात अाली होती. दरम्यान, मागील सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्चे तेल, पेट्रोल अाणि डिझेलच्या दरावर चर्चा करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली होती. 





Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा