Advertisement

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा कपात


पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा कपात
SHARES

गेल्या दोन आठवड्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने घट होत आहे. दिवाळी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.

मुंबईत पेट्रोलच्या दरात 15 पैशांची आणि डिझेलच्या दरात 16 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी मुंबईकरांना आता 83.57 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी 76.22 रुपये द्यावे लागणार आहेत.


दिल्लीतही पेट्रोल स्वस्त

मुंबईप्रमाणे राजधानी दिल्लीत पेट्रोल 15 पैशांनी आणि डिझेल देखील 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे प्रतिलिटर पेट्रोलसाठी 78.06 रुपये आणि प्रतिलिटर डिझेलसाठी 72.74 रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग घट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव घसरल्याने यांचे इंधनाची किंमतीत घट होत आहे. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होताना दिसत आहे. सलग दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाचे भाव वाढले होते. मात्र आता ते काही प्रमाणात स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा