Advertisement

पेट्रोल 17 तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त


पेट्रोल 17 तर डिझेल 16 पैशांनी स्वस्त
photo credit- google
SHARES

पेट्रोल, डिझेलच्या दरात घट होण्याची मालिका अजूनही सुरुच आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात १७ तर डिझेलच्या दरात १६ पैशांची कपात झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८३.०७ तर डिझेल ७५.७६ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
याव्यतिरिक्त राजधानी दिल्लीतही पेट्रोलच्या दरात १७ तर डिझेलच्या दरात १५ पैशांची घट झाली आहे. त्यामुळे तिथे पेट्रोल ७७.५६ रुपयांनी तर डिझेल ७२.३१ रुपये दराने मिळत आहे.


इंधनावरील कर कमी

मागच्या महिन्यात पेट्रोलचे दराने शंभरी गाठली होती. यामुळे आधिच महागाईने हैराण झालेल्या जनतेचा राग अनावर झाला होता. दरम्यान जनतेचा रोष लक्षात घेता केंद्र सरकारने कर कमी करण्याची विनंती केल्यानंतर विविध राज्यांनी इंधनावरील कर कमी केलं. त्यानंतर मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी केल्यानंतर देशात इंधन दर स्वस्त होताना दिसत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा