Advertisement

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त


पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त
SHARES

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या सामान्यांना दिवाळीच्या तोंडावर थोडासा का होईना पण दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट सुरू असून ही घट सोमवारीही पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ३० पैशांनी आणि डिझेल २१ पैशांनी स्वस्त झालं आहे.


मुंबईतील दर

मुंबईत पेट्रोल ८५ रुपये २४ पैसे प्रति लिटर, तर डिझेल प्रति लिटर ७७ रुपये ४० पैसे इतका झाला आहे. मुंबईप्रमाणे दिल्लीतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात सुरू आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ७९.७५ पैसे प्रति लिटर, तर डिझेलचा दर ७३.८५ पैसे प्रति लिटर इतका झाला आहे.

मुंबईत १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याप्रमाणे सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही मुंबईकरांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा