Advertisement

पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त

शनिवार मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
SHARES

केंद्रीय अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलची किंमत आता स्वस्त झाले आहेत. पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवार मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. 

आता केंद्रा पाठोपाठ राज्यांनींही पेट्रोल आणि डिझेलवरचा कर कमी करावी अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे. 

गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे झालेली बिकट अवस्था, रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर वाढलेली महागाई या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा