Advertisement

शौचालय गेलं खड्ड्यात !


शौचालय गेलं खड्ड्यात !
SHARES

खार पूर्व - एक शौचालय उभारायला किती वेळ लागावा? एक महिना... दोन महिने...? पण इथल्या शांतीलाल कंपांउंड, उपाध्याय वाडी चाळीतल्या शौचालयाचं बांधकाम आठ महिन्यांपासून रखडलंय. आठ महिन्यांपूर्वी शौचालयाच्या जागेवर भूमिपूजन झालं, बांधकामासाठी मोठा खड्डाही खणण्यात आला. पण आठ महिन्यानंतरही हा खड्डा आहे तसाच आहे. खड्डा आहे तिथं दिवाही नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी इथून जाणं धोकादायक झालंय. दुसरीकडे शौचालय तोडल्यामुळे अनेकांना शौचालयासाठी लांब जावं लागतंय. तसंच खड्ड्यात घाणीचं साम्राज्य निर्माण झाल्यानं आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. स्थानिक नगरसेवक महेश पारकर यांच्या निधीतून हे सार्वजनिक शौचालय उभारण्याची संकल्पना राबवण्यात अाली होती. याविरोधात स्थानिक मनसे शाखाध्यक्ष रुपेश मालुसरे यांनी पालिका आणि म्हाडातल्या अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा