Advertisement

मुलांनो, आता परीक्षेचं नो टेन्शन, मोदींनी लिहिलं छोट्यांसाठी पुस्तक


मुलांनो, आता परीक्षेचं नो टेन्शन, मोदींनी लिहिलं छोट्यांसाठी पुस्तक
SHARES

परीक्षा आली की मुलांना अभ्यासाचं टेन्शन येतं. पण, आता परीक्षेचं जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. हे कुणी साधी व्यक्ती नव्हे, तर थेट पंतप्रधानच सांगताहेत. टेन्शन कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी 'एक्झाम वॉरियर' नावाचं एक पुस्तकच लिहिलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन 'दिव्यज फाऊंडेशन'च्या प्रमुख अमृता फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी मुंबईच्या शारदा मंदिर शाळेत करण्यात आलं.

हे पुस्तक शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, पालकांसाठी‌ आणि शिक्षकांसाठी लिहिण्यात आलं आहे. मुलांनी परीक्षेला घाबरून न जाता तिला मित्र कसं बनवून घेता येईल, याचे धडे या पुस्तकातून देण्यात आले आहेत. शिवाय, मुलांनी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे? पालकांनी आणि शिक्षकांनी कशाप्रकारे अभ्यास घेतला पाहिजे? याविषयी लिहिण्यात आलं आहे.



दिल्लीत या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. हे पुस्तक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना खूप महत्वाचे ठरेल. मुलांनी स्वत:ची कधी दुसऱ्यासोबत तुलना करु नये. तेव्हाच मुलांचा विकास होईल.
-अमृता फडणवीस, प्रमुख, दिव्यज फाऊंडेशन

या पुस्तकावर कुठेही कमळ दिसत नाही. त्यामुळं हे पुस्तक फक्त मुलांसाठीच लिहिलं आहे. यात कुठेही राजकारण नाही. आतापर्यंत ९ लाख पुस्तकाचं वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आलं आहे, असंही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा