Advertisement

फटाक्यांची आवक कमी असल्याने १० ते १५ टक्के दरवाढ


फटाक्यांची आवक कमी असल्याने १० ते १५ टक्के दरवाढ
SHARES

कोरोना संसर्गाची धास्ती आणि आर्थिक घडी विस्कळीत झालेली असतानाही दिवाळीनिमित्त फटाके खरेदी तेजीत आली आहे. मात्र यंदा बाजारात काही ठरावीकच फटाके उपलब्ध झाले आहेत. परिणामी, ग्राहकांकडून होणाऱ्या फटाक्यांच्या मागणीची पूर्तता करताना विक्रेत्यांची धांदल उडाली आहे. तर अपुऱ्या साठ्यामुळे फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धूसर बनल्यामुळं मुंबईकर फटाके खरेदीसाठी गर्दी गरू लागले आहेत. पाऊस, भुईचक्र, सुरसुरी, आकाशात झेपावणारे रॉकेट, फुलबाजी तसेच मोठा आवाज न करणाऱ्या फटाक्यांना मागणी वाढू लागली आहे. मात्र कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांमध्ये फटाके निर्मितीला फटका बसला आहे. त्यामुळे उपलब्ध फटाक्यांच्या विक्रीवर विक्रेत्यांनी भर दिला आहे.

मनाजोगे फटाके मिळत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये थोडासा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे, तर अपुऱ्या साठय़ामुळे फटाक्यांच्या किमतीही वाढल्या असून नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा