Advertisement

हात गमावलेल्या 'प्रिन्स'च्या पालकांनी पालिकेची मदत नाकारली

हे ५ लाख रुपये ही प्रिन्स १८ वर्षाचा झाल्यानंतर त्यांना वापरण्यास मिळणार होते. सध्याच्या उपचारासाठी ते पैसे वापरता येऊ शकरणार नाहीत असे पालिकेने स्पष्ठ केल्यानंतर प्रिन्सच्या पालकांनी ते पैसे नाकारले.

हात गमावलेल्या 'प्रिन्स'च्या पालकांनी पालिकेची मदत नाकारली
SHARES

परळच्या केईएम रुग्णालयात शॉर्टसर्किट होऊन आगीत हात गमावलेल्या प्रिन्सच्या कुटुंबियांना पालिकेने ५ लाखांची मदत जाहिर केली. ही मदत प्रिन्सच्या आईवडिलांनी नाकारली आहे. नुकसान भरपाईबाबत धोरण ठरवण्यासाठी आज गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये प्रिन्सला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर निर्णय घेतला जाणार आहे.

प्रिन्ससोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर त्याची प्रकृती गंभीर असताना त्यांच्या कुटुंबीयांना पालिकेने १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच त्याच्या शिक्षणाचा खर्च पालिकेने करावा अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, पालिकेने प्रिन्सच्या नातेवाईकांना फक्त ५ लाख रुपये देऊ केले. हे ५ लाख रुपये ही  प्रिन्स १८ वर्षाचा झाल्यानंतर त्यांना वापरण्यास मिळणार होते. सध्याच्या उपचारासाठी ते पैसे वापरता येऊ शकरणार नाहीत असे पालिकेने स्पष्ठ केल्यानंतर प्रिन्सच्या पालकांनी ते पैसे नाकारले. दरम्यान, याबाबत आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक असून त्यात प्रिन्सला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईवर चर्चा होणार आहे.

प्रिन्सवर सध्या केईएमच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. सध्या प्रिन्सची प्रकृती पाहता त्याच्या अनेक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्याला न्यूमोनिया असल्याचे समोर आले आहे. फुफ्फुसामध्ये न्यूमोनियाचा पॅच दिसून आला असून त्याचे पोट फुगले असल्याची माहिती आहे. प्रिन्सच्या जखमांना संसर्ग होऊ नये, म्हणून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अजूनही प्रिन्सची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर आयसीयूत व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.  तसेच, प्लास्टिक सर्जनकडून त्याच्यावर मलमपट्टी केली जात आहे. तसेच, त्याला ऐकू येत आहे की नाही, त्याची देखील तपासणी केली गेली. दरम्यान, प्रिन्सच्या छातीच्या एक्स-रेमध्ये एक छोटा बिंदू आढळला असून तो न्यूमोनियाचा असू शकतो, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. पोटाचे कार्यही मर्यादित झाल्यामुळे त्याच्या खाण्यावर बंधने आली आहेत. पण, सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला न्यूमोनिया झाल्याचे केईएम प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा