सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांचे आंदोलन

 Mumbai
सार्वजनिक बांधकाम कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आझाद मैदान - महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी महासंघाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील पुलांच्या नियमित सखोल तपासणी, देखभाल दुरुस्ती आणि सनियंत्रण याकरिता कार्यालय पदासह औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, पुणे याठिकाणी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत आहे.

मुंबई प्रादेशिक समावेशनासाठी रिक्त पदे नसल्यास या कर्मचाऱ्यांना अन्य प्रादेशिक विभागातील रिक्त पदावर समावेशनास पात्र ठरतील किंवा अतिरिक्त ठरतील अशा कर्मचाऱ्यांना मुंबई प्रादेशिक आणि विभागाच्या बाहेर सेवेसाठी जाणे बंधनकारक ठरणार आहे. जे कर्मचारी जाणार नाही त्यांच्या वेतन आणि भत्ते अदा करण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात धरणे करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष गजानन देसाई यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संकेत जोशी, विजय धोत्रे, सुनिल तांबेवाघ, सरचिटणीस सुर्याकांत इंगले,चिटणीस रा. तावडे हे उपस्थित होते.

Loading Comments