Advertisement

नालासोपारा स्टेशनवर दोन्ही बाजूनं बांधणार भिंत


नालासोपारा स्टेशनवर दोन्ही बाजूनं बांधणार भिंत
SHARES

सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका बसला तो नालासोपाराला. नालासोपारा हा संपूर्ण परिसर आणि रेल्वे स्थानक तीन दिवस पाण्याखाली गेलं. यामुळ नालासोपारावासीयचं जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. तर रेल्वे सेवा ठप्प झाली. आता या पाणी साचण्याच्या समस्येवर पश्चिम रेल्वेनं स्थानकाच्या दोन्ही बाजूनं भिंत बांधण्याचा उतारा आणला आहे.


स्थानक दोन दिवस ठप्प

नालासोपारा रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचं आणि गर्दीचं असं स्थानक. अशातच मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानं हे स्थानक दोन दिवस ठप्प झालं नि यामुळ रेल्वेची मोठी नाचक्की झालीच, पण नुकसानही झालं.
अगदी उच्च न्यायालयानंही या परिस्थितीवरून रेल्वेला फटकारलं आहे. त्यामुळ आता खडबडून जागं होत पश्चिम रेल्वेनं रेल्वे स्थानकावर भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


लवकरच कामाला सुरुवात

त्यानुसार स्थानकाच्या दोन्ही बाजून भिंत बांधत पावसाचं पाणी रोखण्यात येणार आहे. तर प्लॅटफॉर्मचीही उंची वाढवण्यात येणार आहे. या कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. तेव्हा या कामानंतर नालासोपारा रेल्वे स्थानक परिसर जलमय होतो की नाही? हेच आता पाहावं लागेल.

नालासोपारा रेल्वे प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूने 50 मिटर लांब भिंत बांधण्यात येणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. जेणेकरून याच मोसमात ती बांधून पूर्ण होऊ शकेल. सध्या ट्रॅकवर येणारं पाणी अडवण्यासाठी सिमेंटच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.

-  रवींद्र भाकर,  मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा