Advertisement

जी दक्षिण कार्यालयात ध्वजारोहण


जी दक्षिण कार्यालयात ध्वजारोहण
SHARES

परळ - प्रजासत्ताक दिनानिमित्त परळच्या जी दक्षिण कार्यालयात झेंडावंदन करण्यात आलं. या वेळी जी दक्षिण कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. भाग्यश्री कापसे यांच्यासह कार्यालयातील सर्व खात्यातील प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. या दरम्यान कार्यालयातील कर्मचाऱ्याने वासुदेवचा वेश धारण करून स्वच्छतेचा संदेशही दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेमुळेच ग्रामपंचायत, महानगरपालिका अस्तित्वात आल्यानं आपण या पदावर असल्याचं आयुक्त भाग्यश्री कापसेंनी सांगितलं. तसेच जी दक्षिण विभागातील रहिवाशांना उत्तम सोयी-सुविधा पुरवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी या वेळी दिलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा