Advertisement

​26/11 स्पेशल: '२६/११ कसाब अाणि मी' पुस्तकातून उलगडणार कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास

२६/११ हल्ल्याचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेल्या '२६/११ कसाब अाणि मी' या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात अालं.

​26/11 स्पेशल: '२६/११ कसाब अाणि मी' पुस्तकातून उलगडणार कसाबचा फाशीपर्यंतचा प्रवास
SHARES

२६/११ हल्ल्याचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी लिहिलेल्या '२६/११ कसाब अाणि मी' या पुस्तकाचं रविवारी प्रकाशन करण्यात अालं. मुंबई प्रेस क्लबमध्ये राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकात रमेश महाले यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं तपशीलवार वर्णन, पोलिस अधिकाऱ्यांची दृढता, अाणि दहशतवादी कसाब अाणि तपास अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संभाषणाची तपशीलवार माहिती दिली अाहे. 


द अॅटॅक अाॅन द ताज

मराठीत असलेलं हे पुस्तक मेनका प्रकाशनने प्रकाशित केलं अाहे. सेवानिवृत पोलिस अधिकारी रमेश महाले यांनी सांगितलं की,  २६/११ हल्ल्यावर 'द अॅटॅक अाॅन द ताज' हे पुस्तक २५ नोव्हेंबर २०१४ मध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकावरून'२६/११ कसाब अाणि मी' हे पुस्तक लिहिण्याची कल्पना मला सुचली. या हल्ल्यावरील अाधीच्या पुस्तकात पूर्ण माहिती देण्यात अालेली नाही. तसंच मुंबई पोलिसांच्या कामावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात अालेले अाहेत. 


३ रात्री जागेच

हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात अाली होती. या सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की, या हल्ल्याचा तपास चांगल्या प्रकारे करू शकतील असा एकच अधिकारी अाहे, ते म्हणजे रमेश महाले. महाले यांच्यासह त्यांचे वरिष्ठ अधिकारी या काळात ३ रात्री झोपलेही नव्हते. महाले यांनी पाकिस्तानला पाठवलेले अारोपपत्र अाणि कागदपत्रे तयार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. 



हेही वाचा- 

26/11 स्पेशल: सुरक्षेतील सुस्तपणा धोक्याचा!

26/11 हल्ल्यातील दोषींना पकडणाऱ्यास 35 कोटींचं बक्षीस, अमेरिकेची घोषणा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा