Advertisement

26/11 हल्ल्यातील दोषींना पकडणाऱ्यास 35 कोटींचं बक्षीस, अमेरिकेची घोषणा


26/11 हल्ल्यातील दोषींना पकडणाऱ्यास 35 कोटींचं बक्षीस, अमेरिकेची घोषणा
SHARES

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास आज दहा वर्षे पूर्ण होत आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात 166 जण ठार झाले होते. या हल्ल्यात 9 दहशतवादी मारलेही गेले. मात्र त्यावेळी अजमल कसाब हा जीवंत सापडला होता. नंतर त्याला फाशी देण्यात आली असली तरी या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. ते आजही मोकाट फिरत आहेत. पाकिस्तानने या हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदला तर नजरकैदेतून मोकाट सोडलं आहे.

आता मुंबई हल्ल्यातील (मास्टरमाईंड) मुख्य सूत्रधारांना पकडणाऱ्यास 35 कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे.


अमेरिकेकडून घोषणा

'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला केला होता. यामध्ये 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मात्र या दहशतवाद्यांच्या मुख्य सूत्रधारांविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.


35 कोटींचं बक्षीस

मुंबई हल्ल्यातील कट रचणारे हाफिज सईद आणि झकी उर रहमान लख्वी हे या हल्ल्यातील मुख्य सुत्रधार असून यांना पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला 35 कोटींचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा