Advertisement

रिक्षा-टॅक्सी मीटर अपडेट करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा देण्यासाठी अपडेट करण्यास ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

रिक्षा-टॅक्सी मीटर अपडेट करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
SHARES

कोरोना काळात रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा देण्यासाठी भाडेवाढ करण्यात आली. ही भाडेवाढ केल्यानंतर ती प्रत्यक्ष मीटरवर येण्यास (मीटर अद्ययावतीकरण प्रक्रिया) अधिक काळ लागत आहे. दरम्यान, आता ही मीटर अपडेट करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा देण्यासाठी अद्ययावतीकरणाला ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

कोरोना संसर्गाच्या संकटात रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा देण्यासाठी मीटर अपडेट करण्यास ३१ जानेवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या २२ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सीचालकांना भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मीटर अपडेट करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं शासनाच्या निर्देशाप्रमाणे रिक्षा आणि टॅक्सी मीटरचे कामकाज  होऊ शकले नाही. त्यामुळं रिक्षा-टॅक्सी मीटर अपडेट करण्यासची मुदत ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार परिवहन विभागानं ही मुदतवाढ दिल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात ३ रुपये वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. त्यानुसार रिक्षाचं किमान भाडं २१ आणि टॅक्सीचं किमान भाडं २५ रुपये झालं आहे. 

मीटर कॅलिब्रेशन प्रक्रियेसाठी मीटर काढणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे, आरटीओची मंजुरी घेणे अशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ७५०-१००० रुपयांपर्यंत खर्च येतो. लॉकडाऊन काळात उत्पन्नाअभावी या खर्चाचा अतिरिक्त भार चालकांना सहन करावा लागत आहे.

रिक्षा-टॅक्सी मीटर अद्ययावतीकरण मुदतीत न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी एक दिवस परवाना निलंबन, मात्र किमान ७ तर जास्तीत जास्त ३ महिने केलं जाणार आहे. तसंच, प्रतिदिवस ५० रुपये, तर जास्तीत जास्त ५००० रुपये दंड आकारला जाणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा