Advertisement

रामदास आठवलेंनी दत्तक घेतलेल्या 'त्या' बिबट्याचा मृत्यू

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदार आठवले यांनी दत्तक घेतलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला.

रामदास आठवलेंनी दत्तक घेतलेल्या 'त्या' बिबट्याचा मृत्यू
SHARES

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भीम या ९ वर्षांच्या नर बिबट्याचा हृदयक्रिया बंद पडल्यानं मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचं समजतं. भीम या बिबट्याला २०१० मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं होतं. तसंच, या बिबट्याला गेल्या ३ वर्षांपासून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदार आठवले यांनी दत्तक घेत होते.


हृदयक्रिया बंद

भीम बिबट्याच्या मृत्यूनंतर संध्याकाळी ४.४५ वाजता मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील चिकित्सकांनी त्याचं शवविच्छेदन केलंशवविच्छेदन अहवालानुसार, 'भीम' याचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्यानं झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.


निवारा केंद्रात सांभाळ

भीम या बिबट्याला शहापूर येथून २०१० साली लहान असताना आणण्यात आलं होतं. तेव्हापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील निवारा केंद्रातच त्यांचा सांभाळ करण्यात आला. मात्र, एकाच ठिकाणी राहिल्यानं शारीरिक हालचाल होत नाही. परिणामी असे प्राणी लठ्ठ होतात आणि त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो, अशी माहिती वन्यजीव तज्ज्ञांनी दिली आहे.



हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीमुळं पहिल्या सत्रातील परीक्षांच्या वेळापत्रकावर परिणाम

ज्यांना वेतन करार अमान्य आहे, त्यांना बोनस देऊ नये; बेस्टचा निर्णय



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा