Advertisement

स्पुटनिक लसीसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे

भारतात स्पुटनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लसीची किंमत जाहीर केली आहे.

स्पुटनिक लसीसाठी मोजावे लागणार 'इतके' पैसे
SHARES

केंद्र सरकारने कोरोनावरील रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला हिरवा कंदील दाखवला आहे. आता पुढील आठवड्यापासून भारतात स्पुटनिकचेही डोस देण्यात येणार आहेत. भारतात स्पुटनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने या लसीची किंमत जाहीर केली आहे. 

स्पुटनिक लसीची किंमत ९४८ रुपये असेल. त्यावर ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे या लसीचा डोस घेण्यासाठी ९९५ रुपये मोजावे लागणार आहेत. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या लसीचेही दोन डोस घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे या लसींसाठी जवळपास २ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. 

रेड्डीज लॅबने या लसीचं सॉफ्ट लॉन्चिंग करताना शुक्रवारी हैदराबादमधील एका व्यक्तीला लसीचा पहिला डोस दिला.  स्पुटनिक लसीची पहिली खेप १ मे रोजी भारतात आली होती. या लसीची आणखी एक खेप आयात केली जाणार आहे. त्यानंतर स्पुटनिक लसीची जूनपासून भारतातच निर्मिती केली जाणार आहे. भारतात या लसीची निर्मिती झाल्यास त्याची किंमत कमी होईल. 



हेही वाचा -

  1. बापरे! मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या

  2. परराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा