मंदिरावर पालिकेचा हातोडा

 wadala
मंदिरावर पालिकेचा हातोडा
मंदिरावर पालिकेचा हातोडा
मंदिरावर पालिकेचा हातोडा
मंदिरावर पालिकेचा हातोडा
मंदिरावर पालिकेचा हातोडा
See all

वडाळा - उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई कारण्यात येणाऱ्या मंदिरापैकी वडाळा (प.) येथील साईधाम मंदिर 30 नोव्हेंबरला तोडण्यात आलं. 36 वर्ष जुने असलेलं हे मंदिर अनधिकृत देवस्थळांच्या यादीत नमूद असल्यानं पालिका तसंच पोलिसांच्या सहकार्यानं तोडण्यात आलं.  शिवसेना शाखा क्र. 178 च्या विभागप्रमुख माधुरी मांजरेकर यांना मध्यस्थी केल्याने मंदिराचा अतिरिक्त भाग हा स्थानिक रहिवाशांकडूनच पाडून घेतला. "न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून आम्ही मंदिराचा अतिरिक्त भाग म्हणजेच पत्रे आणि शेड पाडून घेतले, उर्वरित मंदिराचा भाग हा तसाच ठेवला गेला, पण मंदिर पडण्याच्या या निर्णयास आमचा अखंड विरोध आहे असं स्पष्ट मत मांजरेकर यांनी व्यक्त केलं.

Loading Comments