Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

सफाई कामगारांचं १५ ऑगस्टला आंदोलन


सफाई कामगारांचं १५ ऑगस्टला आंदोलन
SHARES

आपल्या विविध मागण्यांसाठी सफाई कामगारांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अनेक वर्षांपासून मोर्चा आणि आंदोलन करूनदेखील मागण्या काही मान्य होत नाही, सरकार आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत
सफाई कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी आझाद मैदानात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या सफाई कामगारांनी दिला आहे.


काय आहेत मागण्या?

  • सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणामधून विशेष आरक्षण द्यावं.
  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ठेकेदारी प्रथा बंद करावी.
  • महाराष्ट्र शासनाचा १९८६-१९८७-१९८८ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी
  • घर नसलेल्या सफाई कामगारांना १९८८च्या शासन आदेशानुसार ५ टक्के आरक्षित संदनीकांचं वाटप करावं
  • ऐवजदार, लेबर कामगार अॅवॉर्ड, शवागृहात काम करणारे कामगार, धोबी, स्मशान कामगार, मेन शुअर, पाईपलाईन शुअर, मुख्य मल वाहिन्या, ड्रेनेज वर्क शॉप, स्ट्रेम वॉटर ड्रेन, वाहन स्वच्छक, बाजार विभागातील कामगार, कीटक नाशक फवारणी करणारे कामगार, परिक्षण खात्यातील कामगार, पाणी खात्यातील, खड्डे करणारे कामगार या सर्व कामगारांचा एक वर्ग सफाई कामगार करावा.
  • अनुसूचित जातिचं प्रमाणपत्र देण्याची १०५० ची अट रद्द करून १९६० ही वास्तव्याची अट २००४ नुसार करण्याचा शासन आदेश काढावा.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सफाई कामगार सेल, सफाई कामगार मालकी घर हक्क समिती आणि सर्व कामगार संघटना १५ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. जर या आदोलनानंतरही मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जेल भरो आंदोलन करणार, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस संघटनेचे अध्यक्ष गोविंदभाई परमार यांनी दिला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा