Advertisement

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संजय सेठी


मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संजय सेठी
SHARES

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांची अखेर बदली झाली. मुखर्जी यांची बदली वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाच्या सचिवपदी झाली असून मुखर्जी यांच्या जागी संजय सेठी यांची नियुक्ती झाली आहे. संजय मुखर्जी हे मुंबई महापालिकेत मागील ४ वर्षांपासून अतिरिक्त आयुक्तपदावर कार्यरत होते.


वर्षभरापासून बदलीची हवा

मागील वर्षभरापासून मुखर्जी यांच्या बदलीची हवा होती. तसंच खुद्द मुखर्जीही आपल्या बदलीसाठी इच्छुक होते. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाचे विद्यमान सचिव एस.एस. देशमुख हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यारिक्त जागी मुखर्जी यांची बदली करून मुंबई महापालिकेच्या अतिरिक्तपदी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शेठी यांची वर्णी लावण्यात आली आहे.



संजय शेठी हे १९९२ च्या बॅचचे असून संजय मुखर्जी हे १९९६ च्या बॅचचे आहेत. मुंबईतील सागरी किनारा रस्ता, मलनि: सारण प्रकल्प, मलजल प्रक्रिया केंद्र, सायकल ट्रॅक, भूमिगत जलवाहिनी आदी मोठ्या प्रकल्पांची कामे मुखर्जी यांनी आव्हान म्हणून पुढे नेली.


कुठला भार?

मुखर्जी यांच्याकडे अर्थसंकल्पाचा प्रमुख भार होता. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या मांडणीला ऑक्टोबरपासून सुरुवात होते. त्यामुळे मुखर्जी यांच्या जागी नियुक्ती झालेल्या सेठी यांच्याकडेही प्रकल्प आणि अर्थसंकल्पाची जबाबदारी राहण्याची शक्यता आहे. महापालिकेत आय. ए. कुंदन, आबासाहेब जऱ्हाड आणि विजय सिंघल यांच्या तुलनेत सेठी वरिष्ठ असल्यामुळे ही जबाबदारी सेठी यांच्याकडे राहण्याची अधिक शक्यताही वर्तवली जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा